नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील यशनगरी प्रथमेश अपार्टमेंट काबरानगर परिसरातील रहिवासी तथा ज्येष्ठ महिला सुलोचना प्रभाकर देशमख यांचे वृध्दापकाळाने दि. ९ डिसेंबर मंगळवारी सकाळी ९.३० वाजता राहत्या घरी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात २ मुले,३ सुना, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी दि. ९ रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास राहते घर प्रथमेश अपार्टमेट यशनगरी, काबरानगर परिसर येथून निघाली. त्यांच्या पार्थिवावर शांतीधाम स्मशानभूमी गोवर्तनघाट नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील गणपती मंदिराचे मुख्य पुजारी कांतू महाराज देशमुख व दैनिक पुण्यनगरी नांदेड कार्यालयातील कर्मचारी शशिकांत देशमुख यांच्या त्या आई होत.
More Related Articles
“गंमत असते नात्याची” नाटकाने राज्य नाट्यस्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकली
नांदेड:- महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या ६३ व्या पर्वात “गंमत असते नात्याची” या नाटकाने…
महाराष्ट्राच्या प्रशासनाला विश्वासार्ह चेहरा देण्याचे काम महसूलचे – अपर मुख्य सचिव राजेश कुमार
*महसूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ* • *माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी…
13 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वराह पूजन
नांदेड,(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या कामांची पूर्तता 10 सप्टेंबर पर्यंत झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 13…
