नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर येथे शेतीचा बैनामा करून देण्यासाठी 14 लाख 80 हजार रुपये दिले नाहीत म्हणून फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सोनाली माधवराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 ऑगस्ट 2024 ते 11 एप्रिल 2025 दरम्यान कामठा(बु) ता.अर्धापूर येथील अशोक तुकाराम कल्याणकर यांनी दुय्यम निबंध कार्यालय येथे सोनाली देशमुख यांच्या शेतीचा सौदा करून साक्षीदारासमक्ष सौदा केला. त्यावेळी 16 लाख 80 हजार रुपये दिले होते. पण ठरलेल्या करारातील 14 लाख 80 हजार रुपये देवून ती रजिस्ट्री करायची होती. जमीनीची रजिस्ट्री करतांना अशोक कल्याणकर यांनी रजिस्ट्री तर करून घेतली पण 14 लाख 80 हजार रुपये दिले नाहीत आणि दुय्यम निबंध कार्यालयातून पळून गेले. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 699/2025 दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास नंादेड जिल्ह्यात अत्यंत नामांकित, किर्तीवंत, दमदार, आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरिक्षक नागोराव कुंडगिर यांच्याकडे दिला आहे.
दमदार पोलीस उपनिरिक्षक नागोराव कुंडगिर यांच्याकडे आणखी एक आर्थिक फसवणूकीचा गुन्हा
