आयटीएम कॉलेजमध्ये एचआयव्ही विषयावर शिबिर संपन्न  

नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आरोग्य विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीएम कॉलेज येथे आज एचआयव्ही विषयावर शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे होते.

कोणताही रोग होण्याआगोदरच त्याचा प्रतिबंध करणे काळाची गरज आहे ही महत्वपूर्ण बाब जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव शरद देशपांडे यांनी नमूद केली. एचआयव्ही संदर्भात विविध कॉलेजमध्ये जनजागृती करण्यासाठी रेड रिबेन क्लबची स्थापना करण्यात येत आहे. एचआयव्ही झाल्याने मानवाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आपण वारंवार आजारी पडतो, शरीर कमकुवत होते अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे यांनी दिली.

एचआयव्ही रोग होण्याचे प्रमुख कारणे

• अनैतिक संबंध (एच.आय.व्ही.ग्रस्त सोबत)

• वैद्यकिय उपकरणे (एच.आय.व्ही. विषाणु असलेले)

• रक्त आणि रक्त घटक (एच.आय.व्ही. विषाणू असलेले रक्त)

• गर्भवती आई पासुन बाळाला(एच.आय.व्ही. ग्रस्त आई)

जिल्हयात एप्रिल 2025 पासून 4 डिसेंबर पर्यंत 27 गर्भवती एचआयव्हीग्रस्त मातेच्या बाळांना एचआयव्ही रोग होण्यापासून बचाव करण्यात यशस्वीरित्या कार्य पुर्ण केले आहे. एचआयव्ही संदर्भात माहितीसाठी टोल फ्रि क्रमांक 1097 बदल असल्याची माहिती यावेळी दिली. आय.सी.टी.सी.केंद्र समुपदेशक माधव सुगावकर यांनी एचआयव्ही विषयावर मार्गदर्शन केले. मुलांना जनजागृती करण्याचे आवाहन केले व रेडरिबेन क्लब बद्दल माहिती दिली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन आयटीएम कॉलेजचे डॉ. महेश राजुरकर यांनी तर डॉ. पी. पी. कदम यांनी आभार मानले. या कार्यक्रमास जवळपास 198 विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!