६४ व्य महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेची पुन्हा एकदा हाऊसफुल ने सांगता
नांदेड – सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२५–२६ च्या प्राथमिक फेरीत नांदेड केंद्रावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या च्या वतीने ‘तो ती आणि मनोहर ’ हे नाटक सादर करण्यात आले. शंकरराव चव्हाण नाट्यगृह, नादेड येथे सायंकाळी सात वाजता झालेल्या या प्रयोगाला नाट्य रसिकांनी हाऊसफुल केले.
या नाटकात मनोहर नावाच्या एका तरुणाचा प्रवास दाखवला आहे. प्रवास त्याच्या त्याच्या अंतर्मनाचा त्याच्या अंतरंगात चाललेल्या गोधळाचा. महाहर जेंव्हा एका रात्री आत्महत्या करण्यासाठी एका ढासळलेल्या, गूढ मंदिरात येतो तेंव्हा तो प्रत्यक्ष स्वतःच्या मनात प्रवेश करतो. ते मंदिर त्याचं शरीर आहे, बाबा त्याचं अंतर्मन आणि त्या अंधारातला सावल्या त्याच्या भूतकाळातल्या गुन्ह्यांचे प्रतिबिंब. जेंव्हा नाटक सुरु होतं तेंव्हा मंदिराच्या गाभाऱ्यात मनोहरच्या मनाप्रमाणे गाभारा पोकळ असतो. पण नाटकाच्या अखेरीस जेव्हा तो कमळाचे फुल गाभाऱ्यात ठेवतो तेंव्हा त्याच्या अंतर्मनाला खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त होतं आणि अंतर्मनाचा गोंधळ उलगडतो.

हे नाटक अतिशय गुंतागुंतीचे असून प्रेक्षकांना शेवटपर्यंत कथेने खेळवत ठेवले. तो ती आणि मनोहर च्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शक अतुल साळवे यांनी व्यक्तीच्या मनाचे प्रतिबिंब, त्याच्या मनाचा गोंधळ आणि अंतर्मनाला जाणून घेण्याची धडपड या नाटकाच्या माध्यमातून प्रभाविपणे मांडण्यात आले.
कथेला अनुसरून सुंदर असे नैपथ्य, प्रकाश योजनेतील वेगवगळे रंगप्रयोग हे नाट्य रसिकांना दृश्यांचा अनुभव देत होती. नाटकातील दृश्ये आणि आणि दृश्यांची गरज ओळखून योग्य संगीत आणि प्रकाश योजना यामुळे नाटकातील दृश्ये प्रभाविपणे प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली. कलाकारांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण प्रेक्षागृह भारावून गेले होते. दमदार अभिनय, कथेला पूरक तेवढे नैपथ्य आणि योग्य ते संगीत यांमुळे हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. हे नाटक नाटक नसून हि एक मनाची यात्रा आहे, शरीराच्या मंदिरातून अंतर्मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोंचविण्याची हा संदेश या नाटकाने दिला.


या नाटकात मनोहर याची प्रमुख भूमिका विजय भालेराव यांनी केली तर ‘तो’ या पात्राची भूमिका राहुल मोरे यांनी केली. आणि ‘ती’ या पात्राची भूमिका सपना वाघमारे यांनी केली. तर इतर भूमिका कविता (मानसी बेलापूरकर), सावली १ (चंद्रकांत तोरणे), सावली २ (करण गुडेवार) यांनी केली.
या नाटकाला यशस्वीरीत्या सादर करण्यासाठी संगीत (अतुल साळवे), प्रकाश योजना (माणिकचंद थोरात), रंगभूषा आणि वेशभूषा (द्वारका साळवे व कांचन वसेकर), नैपथ्य (राहुल गायकवाड) या सर्व टीमने रंगमंचाबाहेर परिश्रम घेतले.
