नांदेड(प्रतिनिधी)-26 नोव्हेंबर रोजी विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देवून 75 वर्ष पुर्ण झाली आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिका शाळा पिवळीगिरणी आणि चंद्रमुणी शाळा डॉ.आंबेडकरनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

आज संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त ऍड. शिलवंत विजय शिवभगत, ऍड. विशाल संजय गच्चे यांनी डॉ.आंबेडकरनगर येथील चंद्रमुणी शाळा आणि पिवळी गिरणी येथील महानगरपालिका शाळेत बालकांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप केले. आजच्या भारतीय समाजत शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षणानेच व्यक्तीचा संर्वांगिग विकास होत असतो आणि त्यामुळेच आदर्श समाज घडतो. पुढील काळामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा पुढे न्यायचा असेल तर गरीब समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे एकमेव माध्यम आहे म्हणून शिक्षा, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला.

