नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार 13 मे रोजी राबविलेल्या एका वाहतूक सुधारणा मोहिमेत 616 प्रकरणांमध्ये 4 लाख 42 हजार 250 दंड आकारला आहे. शहरातील दोन्ही वाहतूक शाखा, दंगल नियंत्रक पथक पोलीस यांनी रेल्वे स्थानक, महाराणा प्रताप चौक, तरोडेकर मार्केट, कलामंदिर, देगलूर नाका, जुना मोंढा, बरकत कॉम्पेक्स, बर्की चौक, ढवळे कॉर्नर याठिकाणी बिनापरवाना, ऑटोचे परमीट नसलेल्या, गणवेश परिधान न करणाऱ्या ऑटोचालकांविरूद्ध मोहिम राबविली. यात वजिराबाद वाहतूक शाखेने 549 प्रकरणे राबविली तर इतवारा वाहतूक शाखेने 67 प्रकरणे राबविली. दोन्ही वाहतूक शाखांनी मिळवून 616 ऑटोचालकांवर कार्यवाही करून 6 लाख 42 हजार 250 रूपयांचा दंड आकारला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,101 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राज्यात आठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अर्धापूर-शनि पार्डी रस्त्यावर जबरी चोरी; बारडमध्ये बिअर बार फोडले; कौठा बसस्थानकात महिलेचे दागिने चोरले