नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीस ठाण्यात दहा हजार रुपये लाच घेवून पुन्हा दहा हजारांची मागणी करून तडजोडीनंतर 5 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गणपत नागोराव गिते यांना कंधार न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काल दि.25 नोव्हेंबर रोजी सोनखेड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक गणपत नागोराव गिते यांनी 5 हजार रुपयांच लाच स्विकारली आणि त्यांना अटक झाली. आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरिक्षक माधुरी यावलीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडलेल्या गणपत नागोराव गिते यांना कंधार न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड. महेश कागणे यांनी या प्रकरणात पोलीस कोठडी देणे का आवश्यक आहे याचे सविस्तर सादरीकरण केले. गणपत गिते यांच्यावतीने अँड. मनिष रामेश्वर शर्मा (खांण्डील) यांनी बाजु मांडली. युक्तीवाद ऐकल्यानंतर कंधार जिल्हा न्यायाधिशांनी गणपत गिते यांना 2 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी….
लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाला पोलीस कोठडी
