हदगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराकडून ५,७०० रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेल्या महिला नायब तहसीलदार तथा जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी सुमन कऱ्हाळे यांना न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत न्यायालयीन कोठडी अर्थात तुरुंगात पाठवण्याचा आदेश दिला आहे.
२२ नोव्हेंबर रोजी हदगाव तहसील कार्यालयाच्या परिसरात लाच रकमेची देवाणघेवाण होत असताना सुमन कऱ्हाळे यांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.
आज पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी जामीन अर्जाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असल्याने, आणि त्या प्रक्रियेस वेळ लागणार असल्याने, न्यायालयाने सुमन कऱ्हाळे यांना न्यायालयीन कोठडीत (तुरुंगात) पाठवण्याचे आदेश दिले आहेत.जामीन अर्जाची नोंदणी व सुनावणी झाल्यानंतर त्यांच्या जामीनावर निर्णय होणार आहे.
संबंधित बातमी ….
कमिशनच्या टक्केवारीत लाच मागणाऱ्या महिला नायब तहसीलदाराला पोलीस कोठडी
