नांदेड(प्रतिनिधी)-स्वस्त धान्य दुकानाकडून त्याला मिळालेल्या एकूण कमिशनपैकी टक्केवारीने लाच मागणाऱ्या महिला पुरवठा निरिक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार हदगाव यांना न्यायालयाने एका दिवसासाठी पोलीस कोठडीत पाठविले आहे.
हदगावच्या पुरवठा निरिक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांनी एका स्वस्त धान्य दुकानदाराकडून त्याला मिळालेल्या 57 हजार रुपयांच्या कमिशनमध्ये 20 टक्के रक्कमेची लाच मागितली. ती 11 हजार 400 रुपये होते. पण पुढे मागणीची पडताळणी करतांना झालेल्या तडजोडीत 10 टक्के रक्कम अर्थात 5 हजार 700 रुपये लाचेची मागणी केली आणि लाचेची रक्कम टाटा इंट्री ऑपरेटर गोविंद अप्पाराव जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले. लाचेचे पैसे घेताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना जेरबंद केले.
आज या गुन्ह्याच्या तपासीक अंमलदार अर्चना करपुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडलेल्या महिला नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळेला न्यायालयात हजर करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. या प्रसंगी सरकारी वकील ऍड. एम. ए. बतुल्ला (डांगे) यांनी पोलीस कोठडी का आवश्यक आहे याचे सविस्तर विवरण न्यायालया समक्ष केले. न्यायालयाने एका दिवसासाठी ती मंजुर केली आहे.
संबंधीत बातमी…
५७०० रुपयांसाठी स्वाभिमान विकला: महिला नायब तहसीलदार आणि ऑपरेटर लाचेखोर ठरले
