नांदेड – नांदेड जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात आला. यावेळी रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदू पाटील यांनी मधुमेहाची लक्षणे, मधुमेहामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच मधुमेह आजारासंबंधी घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थी, उपस्थित रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपाच्या अनुषंगाने बोलतांना एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील म्हणाले की, दिवसेंदिवस व्यक्तीचे शारीरिक (कष्टाची कामे) कमी होत आहेत, त्यामुळे त्यांना मधुमेहासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान अर्धा तास तरी शारीरिक व्यायाम तसेच कष्टाची कामे केले पाहिजे. तसेच आहारात मिठ आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवावे, संतुलित आहार घ्यावा जेणेकरून व्यक्तींना मधुमेह सारखा आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. यावेळी तंबाखूमुक्त युवा अभियान ३.० जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकरी डॉ. एच.के. साखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी माने, डॉ.सुमित लोमटे, डॉ. शाहू शिराढोणकर, डॉ.सुजाता राठोड, डेंटल सर्जन डॉ. दीप्ती सूर्यवंशी, एनसीडी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मेट्रन सुनिता राठोड, प्राचार्या सुनिता बोथीकर, इंचार्ज श्रीमती नारवाड, श्रीमती बंडेवार तसेच जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी, नर्सिंग महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉ. विखारुनिसा खान यांनी तर सूत्रसंचालन बालाजी गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश आहेर, सदाशिव सुवर्णकार, सुनिल तोटेवाड व चंद्रभान कंधारे यांनी परिश्रम घेतले.
