उद्या  बालदिनानिमित्त पेनूर हायस्कूलमध्ये बालकविसंमेलनाचे आयोजन

नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!