नांदेड(प्रतिनिधी)-मागील आठवड्यात नांदेड शहरामध्ये दोन खूनाच्या घटना घडल्या. आज नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पोलीस दप्तरी देगलूर आणि धर्माबाद या दोन ठिकाणी दोन खून झाले आहेत.
लाईनगल्ली देगलूर येथील शेख बाबु गुडूसाब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 नोव्हेंबर रोजी रात्री 11.20 वाजेच्यासुमारास अंबिका ऑईल मिलच्या शेजारी असलेल्या देशी दारु दुकानास शेख निसार शेख बाबु (30) यास शेख शादुल शेख नबी साब (41) याने शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन मारहाण करून गंभीर दु:खापत केली. त्यात त्याचा खून झाला. देगलूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 525/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
शक्करगंज धर्माबाद येथील निलेश शंकरराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 नोव्हेंबर रोजी रात्री 2 ते 3 वाजेदरम्यान त्यांचा भाऊ आशिष शंकरराव पाटील (29) यास त्यांचा भाऊ अरुण शंकरराव पाटील (30) याने घर नावावर करण्याच्या कारणासाठी मारहाण करून दु:खापत केली. त्यात आशिष पाटीलचा मृत्यू झाला आहे. धर्माबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 311/2025 प्रमाणे दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक पगलवाड अधिक तपास करीत आहेत.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पोलीस दप्तरी जिल्ह्यात दोन खून
