रातोळीच्या जुगार अड्‌ड्यावर धाड ; 29 जुगार्‍यांवर कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे रातोळी शिवारात गुपचूप चालणार्‍या जुगार अड्‌ड्यावर बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक आणि दुसर्‍या पोलीस ठाण्याचे पोलीसांनी मिळून छापा टाकला तेंव्हा तेथे 29 जुगारी सापडले. त्यांच्याकडून 16 लाख 62 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक शाम पानेगावकर यांनी आज पहाटे 3 वाजेच्यासुमारास पोलीस उपनिरिक्षक लोखंडे, तोटेवाड, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुदाम जाकोरे, पोलीस अंमलदार भगवान कोतापल्ले, मुद्देमवार, पल्लेवाड, इंगोले, निम्मलवाड, अनिल रिंदकवाले आणि ममता बादे यांना सोबत घेवून रातोळी शिवारातील विजय पाटील यांचे शेत गाठले. त्या ठिकाणी अनेक जण जुगार खेळत होते.
पोलीस पथकाने तेथे पकडलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत गजानन चंद्रकांत मोरे रा. गायकवाड गल्ली मुखेड, आकाश व्यंकटराव दरेगावे रा. दिपनगर मुखेड , शिवाजी बाबुराव पाटील रा. फुले नगर मुखेड , चंद्रकात विश्वांभर पाटोदे रा. बेरळी ता. मुखेड , व्यंकट गंगाराम देवकर रा. शहाजी नगर देगलुर , व्यंकटी पांडुरंग शिंदे रा. मांजरम ता. नायगाव , मनोहर शेषेराव जाधव रा. मोकासदरा ता. नायगाव , सायलु रामलु नागशेटवार रा. दत्तनगर देगलुर ता. देगलुर ,धर्मेंद्र गंगाधर दारमवार रा. लाईनगल्ली देगलुर , धम्मपाल यादवराव कांबळे रा. सिध्दार्थ नगर देगलुर , गणेश राजु बच्चेवाड रा. पेंडपल्ली ता. देगलुर , सिध्देश्वर माधवराव घोणसे रा. व्यंकटेश नगर मुखेड , आशितोष सुर्यकांत पत्तेवार रा.नाथ नगर देगलुर , शेख सिध्दीकी शेख मैनोदीन रा. अशोक नगर मुखेड ,देवीदास प्रभु गोरलावाड रा. गोकुळ नगर देगलुर , सुरेश किशनराव चोंडेकर रा. फुले नगर देगलुर , संगमेश्वर ऊर्फ बजरंग राजेश्वर कल्याणी रा. मनोहर टाकीज जवळ मुखेड , प्रताप दशरथ रघुवंशी रा. सिडको नांदेड , महेश नागनाथ नागमवार रा. देगलुर ,योगेश रामदास राऊलवार रा. शांतीनगर देगलुर , अदित्य अशोकराव देवडे रा. भाहेगाव रोड देगलुर , बालाजी मल्हारी कोणकेवाड रा. आनंदनगर देगलुर ,समीर खययुम शेख रा.तबेला गल्ली मुखेड , गंगाधर अमृत घायाळे रा. गायकवाड गली मुखेड , गजानन श्रीनिवास इंदुरकर रा.बंडा गल्ली देगलुर , गंगाराम शिवन्ना कांदमवार रा. शिवबा नगर देगलुर ,राजु उत्तम पवळे रा. सिडको नांदेड , अमजत ताहेरखान पठाण रा. मोमीनगल्ली मुखेड ,इरवंत लच्छमन्ना रा. गोकुळनगर देगलुर अशी आहेत. या सर्व जुगार्‍यांकडून 2 लाख 68 हजार 450 रुपये रोख रक्कम, तिन चारचाकी गाड्या, एक दुचाकी, 26 मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 16 लाख 62 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विजय पाटील यांचे शेत असल्याने बिलोली येथील पोलीस उपनिरिक्षक सुरजकुमार तिडके यांच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा क्रमांक 222/2025 दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!