ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेचे नि:शुल्क प्रशिक्षण ऑनलाईन अर्ज करण्यास 5 नोव्हेंबर मुदत

नांदेड – “ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेच्या” शैक्षणिक वर्ष 2025-26 निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या गुगल लिंकवर बुधवार 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत सहभाग नोंदविण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

 

अमृतच्या लक्षित गटातील (ब्राम्हण, मारवाडी, राजपूत, गुजराथी, कम्मा, कायस्थ, बंगाली, कोमटी, आर्य वैश्य, सिंधी, ठाकूर, येलमार, त्यागी, सेनगूथर, बनिया, राजपुरोहित, नायडू, पाटीदार, भूमीहार इ.) युवक-युवतींना रोजगारक्षम कौशल्य विकासाअंतर्गत स्थापित DGCA मान्यता प्राप्त “ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना” इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) पुणे यांच्याकडून राबविण्यात येत आहे.

सन 2025-26 च्या ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेच्या लाभार्थी निकषांबाबत सविस्तर माहिती अमृत पुणे www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून प्रशिक्षणपूर्व चाचणी परीक्षेसाठी https://forms.gle/Fq1AfmTEHiiVFKhr7 या गुगल लिंक वर बुधवार 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत नोंदणी करावी.

“ ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेच्या” शैक्षणिक वर्ष २०२५-२६ निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आवश्यकता नोंदणी : https://forms.gle/Fq1AfmTEHiiVFKhr7. आवश्यकता नोंदणी मोहिम यशस्वी करण्यासाठी सदर गुगल फॉर्म भरावा, असेही आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!