नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी- २०२५ च्या परीक्षा दि.११ नोव्हेंबर, २०२५ पासून सुरू होणार आहेत. या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा आवेदनपत्र भरलेले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने पुनश्च एक दिवसासाठी ऑनलाइन लिंक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार, महाविद्यालय स्तरावर पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्र अतिरिक्त शुल्कासह दि.४ नोव्हेंबर, २०२५ रोजी कार्यालयीन वेळेत ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावेत, अशी सूचना देण्यात आली आहे. सदर भरलेली आवेदनपत्रे अतिरिक्त शुल्कासह दि.६ नोव्हेंबर, २०२५ रोजी विद्यापीठात सादर करावीत. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षा आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी पत्राद्वारे केले आहे.
