नांदेड(प्रतिनिधी)-औषध घेण्याचे आमिष दाखवून एका 68 वर्षीय व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक करून त्यांच्या बॅंक खात्यातील 1 लाख 40 हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत.
बालाजी श्रीराम उत्तरवार (68) हे फुलेनगरमध्ये राहतात. त्यांनी दिलेल्यात क्रारीनुसार 29 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान व्हेरीकोज व्हेन कंपनीचे औषध परत घेण्याचे आमिष दाखवून त्यांच्या मोबाईल फोनवर currier APK फाईल पाठवून ती डाऊनलोड करायला लावली आणि त्यांचा फोन हॅक करून त्यांच्या बॅंक ऑफ इंडिया खात्यातून 1 लाख 40 हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलीसांनी या गुन्ह्यात तंत्रज्ञान कायदा न लावता. भारतीय न्याय संहितेनुसार हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक तुरनर अधिक तपास करीत आहेत.
ऑनलाईन फसवणूकीत शिवाजीनगर पोलीसांनी तंत्रज्ञान कायदा जोडला नाही
