नांदेड(प्रतिनिधी)-30 ऑक्टोबर रोजी डॉ.आंबेडकर ते काब्दे हॉस्पीटल रोडवरील आपल्या घरासमोरील अंगण झाडणाऱ्या एका महिलेचे मंगळसुत्र चोरट्यांनी तोडून नेले आहे.
डॉ.आंबेडकरनगर ते काब्दे हॉस्पीटल रस्त्यावर घर असणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्या आपल्या घरासमोरील अंगण झाडत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 7 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र बळजबरीने चोरून नेले आहे. शिवाजीनगर पोलीसांनी या घटनेचा गुन्हा क्रमांक 397/2025 दाखल केला असून पोलीस हवालदार आकोसकर अधिक तपास करीत आहेत.
महिलेचे गंठण तोडले
