नांदेड(प्रतिनिधी)-दरवर्षी प्रमाणे यंदाही सचखंड श्री हजुरसाहिब येथून नगरकिर्तन काढून आनंद व्यक्त करण्यात आला.
दरवर्षी गुरुद्वारा येथून दिवाळीनंतर नगरकिर्तन निघते. वाजत-गाजत, फटाके वाजवत हे नगरकिर्तन गुरुद्वारा येथून निघते. पुढे देना बँक चौक, महाविर चौक, वजिराबाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, महात्मा गांधी यांचा पुतळा या मार्गाने परत गुरुद्वारा येथे पोहचते. या नगरकिर्तनमध्ये श्री.गुरुग्रंथ साहिबजी विराजमान असतात. त्यांच्या वाहनासमोर भाविक झाडू मारतात, पाणी टाकतात. युवक आणि बालके फटाक्यांचा आनंद घेत असतात. नगरकिर्तनात विराजमान श्री गुरुग्रंथ साहिबजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रिघ लागते. अनेक भाविक आरती करतात आणि प्रसाद वितरण होत राहते. वृत्त प्रसारीत करेपर्यंत हे नगरकिर्तन सुरू आहे.

