नांदेड(प्रतिनिधी)-मांडवी पोलीस ठाण्यात गैर कायद्याची मंडळी जमून पोलीस अंमलदारासोबत धक्काबुक्की करणाऱ्या 23 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार खंडेराव श्रीपत जानकर बकल नंबर 681 हे 22 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वाजेच्यासुमारास पोलीस ठाणे मांडवी येथे आपले शासकीय काम करत असतांना राजेश नथुजी पवार (50) आणि त्यांच्यासोबत इतर 22 जणांनी पोलीस अंमलदार जानकर यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा केला. याप्रकरणी मांडवी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 100/2025 दाखल केला असून महिला पोलीस अंमलदार कनाके अधिक तपास करीत आहेत.
मांडवी पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की
