अर्धापूर (प्रतिनिधी)-अर्धापूर -नांदेड रस्त्यावर चहा पिण्यासाठी थांबले असतांना एका बॅगमधून 62 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता घडली आहे.
महादेव नागेंद्र गिरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते रा.शिंदेवाडी ता.माजलगाव जि.बीड येथील आहेत. 14 ऑक्टोबर रोजी ते आणि त्यांची बहिण छोटा हाती वाहन क्रमांक एम.एच.42 बी.एफ. 2339 मध्ये बसून प्रवास करत असतांना नंादेड-अर्धापूर रोडवरील याराना टी हाऊसजवळ चहा पिण्यासाठी थांबले. त्यावेळी त्यांच्या बहिणीच्या जवळील लेडीज बॅग वाहनाच्या सिटवरच होती. त्या पर्समधील 40 हजार रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल 12 हजारांचे असा एकूण 62 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. अर्धापूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 599/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार बोदेमवाड अधिक तपास करीत आहेत.
नांदेड-अर्धापूर रस्त्यावर 62 हजारांची चोरी
