महापालिका प्रशासनाने घेतला एका होतकरु कर्मचाऱ्याचा जीव

मयत स्वच्छता निरीक्षक विजय वाघमारे यांच्या इच्छापत्राने झाला खुलासा
नांदेड -महानरपालिका नेहमी वेगवेगळ्या विषयाने चर्चेत येत असते परंतु सध्या मात्र महापालिका एका विचित्र विषयाने चर्चेत आली असुन महानगरपालिकेतील एका मयत स्वच्छता निरीक्षकाने त्याच्या मृत्युपूर्वी इच्छापत्र लिहुन ठेवुन त्याच्यावर झालेला अन्याय अत्याचाराची आपचीती कथन केली आहे.
महापालिकेत मागील १८ वर्षापासुन विजय सोनाजी वाघमारे हे स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी मृत्यु झाला. संबंधीत हे मागील कालावधीपासुन आजारी होते या आजारपणातच त्यांनी बंद लिफाफ्यात एक इच्छापत्र रजिस्टर्ड नोटरीसह करुन ठेवले होते. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलास एका बंद लिफाफा सापडला होता. त्या लिफाफ्यावर एक संदेश लिहिण्यात आला होता की, सदरील लिफाफा हा पोलीस प्रशासन व काही निवडक क्तींच्या समोर उघडुन त्यांचे वाचन करावे. त्याप्रमाणे पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे पोलीस निरीक्षका समोर पोलीस डायरीत नोंद करुन या इच्छापत्राचे वाचन करण्यात आले असता या सर्व गोष्टीचा उलगडा झालेला आहे.
या इच्छापत्रात मयत विजय वाघमारे यांना महापालिकेतील अधिकारी व सहकारी कर्मचारी खुप मानसिक त्रास देत असल्याचे नमुद करुन त्यांच्या हाताखालील असणारा शिपाई गणेशसिंह ठाकुरने त्यांचा घात करुन त्यांची बदली इतवारा वार्डात करुन आनंद नगर वार्डाचा प्र. स्वच्छता निरीक्षक म्हणून पदभार घेतला. काही कालावधी नंतर वाघमारे हे इतवारा वार्डात चांगले काम करीत असतांना तिथे सुध्दा त्यांच्या तक्रारी करायला लावुन मुख्य स्वच्छता निरीक्षक वसीम तडवीच्या सहाय्याने पुन्हा त्यांच्या ठिकाणी इतवारा वार्डात येऊन त्यांची तेथुन बदली ठाकुरने करायला लावली या ठाकुर मुळे वाघमारे यांचा भयंकर मानसिक छळ झालेला असुन या ठाकुरकडे त्यांची बरीचशी आर्थिक गुंतवणुक जसे की मासिक बीसी बगैर इत्यादी रक्कम आहे परंतु तो देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे या इच्छापत्रात नमुद करण्यात आले आहे.
तसेच मयत विजय वाघमारे यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन स्वच्छता विभागातील त्यांचे सहकारी *मुख्य स्वच्छता निरीक्षक वसीम तडवी, स्वच्छता निरीक्षक सतीश मुक्कापल्ले, गणेश मुदीराज, शेख नईम* ह्यानी वाघमारे यांना त्रास देत आर्थिक संकटात आणले असल्याचे मयताने नमुद केले आहे. त्याचप्रमाणे गणेश मुदीराज यांचा तर वाघमारे यांना आनंद नगर वार्डातुन हटवून त्यांच्या जागी येण्याचा डाव असुन मयत हे इतवारा वार्डात काम करीत असतांना तर वासीम तडवी यांनी त्यांच्याकडुन दरमहा हप्ता घेतला असल्याचे मयत्ताने आपल्या इच्छापत्रात नमुद केले आहे. या सर्व संबंधीतांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा मी प्रयन्त करत असतांना या लोकांकडुन मला धमकी देण्यात येत होती, माझ्या हयातीनंतर या सर्व लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे मयत वाघमारे यांनी इच्छापत्रात नमूद करून ठेवले आहे.
या मयताचे इच्छापत्रामध्ये महापालिकेमध्ये एकच खळबळ माजली असुन मयताच्या कुटुंबाने दि.१४ ऑक्टोबर २०२५ रोजी रितसर पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल करून सर्व संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणावर मनपा आयुक्त काय भूमिका घेतील यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!