नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी एका 19 वर्षाच्या युवकासह तिन विधीसंघर्षग्र्रस्त बालकांना पकडून त्यांच्याकडून तीन चोरीच्या दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
12 आणि 13 ऑक्टोबर दरम्यान भाग्यनगर आणि वजिराबाद पोलीस ठाण्यात दोन दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. या संदर्भाची माहिती घेत असतांना पोलीस उपअधिक्षक रामेश्र्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनात भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे, महेश माळी, पोलीस उपनिरिक्षक नरेश वाडेवाले, विनोद देशमुख, पोलीस अंमलदार विशाल माळवे, गजानन किडे, राजू घुले, अदनान पठाण, विष्णुकांत मुंडे, राहुल लाठकर, नागनाथ सापके, देवसिंग सिंगल यांनी 13 ऑक्टोबर रोजी आसना ब्रिजजवळ थांबलेल्या चार जणांना ताब्यात घेतले. विचारपुस केल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी क्रमांक एम.एच.26 यु.3345, एम.एच.22 ए.वाय.5522 आणि एम.एच.26 डब्ल्यू 238 या बाबतच विचारणा केली असता त्या दुचाकींची कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. पोलीसांनी मिळवलेल्या माहितीनुसार भाग्यनगर आणि वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हदीतून चोरी गेलेल्या दोन दुचाकी यात आहेत. आणि तिसरी एक चोरीची गाडी अशा तिन गाड्या 70 हजार रुपये किंमतीच्या त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत. या प्रकरणी गणेश उर्फ चुहा बालाजी हिंगोले याच्यासह तिन विधीसंघर्षग्रस्त बालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
भाग्यनगर पोलीसांनी चार जणांना पकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या
