नांदेड(प्रतिनिधी) -सुरेश राठोड यांच्या तांडा बिअर बारमधील मॅनेजरला खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश राठोड यांच्या मालकीचा तांडा बिअर बार हा रेल्वे स्थानकासमोर आहे. तेथे लॉजींग विभागात व्यवस्थापक असलेल्या प्रद्मुन उर्फ अक्षय संभाजी राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 ऑक्टोबरच्या रात्री 1 वाजता हॉटेल कुणाल डिलक्स येथे शेख इरफान उर्फ कुबडा आणि शेख नदीम हे दोघे आले आणि दारु पिण्याकरीता महिना 5 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे सांगून शिवीगाळ केेली आणि धाक दाखवून खंडणीची मागणी केली. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 408/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
सुरेश राठोड यांच्या तांडा बारमधील मॅनेजरला खंडणीची धमकी
