नांदेड(प्रतिनिधी)-एप्रिल 2025 पासून ओळखीच्या फायद्यानंतर अनुसूचित जातीच्या महिलेसोबत अत्याचार करणाऱ्या उदगीरच्या 50 वर्षीय व्यक्तीला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेला दोन आपत्य आहेत. ती बचतगट चालवून व सामाजिक कार्य करून आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करून आपले जीवन चालविते. सात-आठ महिन्यापुर्वी सोनखेडहून परत येत असतांना त्यांनी एका 4 चाकी गाडीला लिफ्ट मागितली आणि त्याने लिफ्टी दिली. त्या व्यक्तीचे नाव शेख अब्दुल समद शेख मकबुल (50) रा.वडारगल्ली, उमाचौक उदगीर जि.लातूर असे आहे. त्यानंतर त्याने या महिलेसोबत सतत संपर्क राखूनन मैत्री वाढवली आणि अनेक वेळेस तिच्यावर अत्याचार केला. हा अत्याचाराचा प्रकार हैद्राबाद रस्त्यावरून गोपाळचावडीकडे जाणाऱ्या सामसुम रस्त्यावर घडलेला आहे. सर्वात शेवटचा अत्याचार 13 सप्टेंबर 2025 रोजी झाला आहे.
या तक्रारीप्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमे 3(1)(डब्ल्यू) (2), 3(2)(व्ही.ए.) प्रमाणे गुन्हा क्रमांक 953/2025 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांच्याकडे देण्यात आला. आज प्रशांत शिंदे यांनी शेख अब्दुल समदला न्यायालयात हजर केल्यानंतर सहाय्यक सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी पोलीस कोठडी कशी आवश्यक आहे यासंदर्भाने युक्तीवाद केला. न्यायाधीशांनी शेख अब्दुल समदला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
अनुसूचित जातीच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्याला दोन दिवस पोलीस कोठडी
