अन्यथा शेतकऱ्यांचा महामोर्चा घेऊन रस्त्यावर उतरू – खा. रवींद्र चव्हाण
नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र पहाणीच्या पलीकडे कोणतीही मोठी मदत होत नाही. हेक्टरी तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन, हेक्टरी पन्नास हजार तात्काळ मदत द्या, पंचनाम्यानुसार अधिकची भरीव मदत द्यावी, शहरी भागातील पुरग्रस्तांना पंचवीस हजार मदत द्यावी अन्यथा शेतकऱ्यांचा महामोर्चा घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा खा. रवींद्र चव्हाण यांनी सरकारला दिला आहे.
ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेले असताना पाहणीच्या पलीकडे काही होत नसल्याने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार मदत द्यावी यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या विशेष उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार (ता.७) रोजी जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी खा. रवींद्र चव्हाण, दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, श्रावण रँपनवाड, डॉ. यशपाल भिंगे, मसुद खान, आनंद चव्हाण, जयश्री पावडे, संजय बेळगे, तिरुपती पाटील कोंढेकर, निवृत्ती कांबळे, गोविंदबाबा गोंड, सुनील वानखेडे, प्रताप देशमुख बारडकर, रामराम पाटील रावनगावकर, शिवाजी पाटील पाचपिपळेकर, शेर अली खान, बालाजी गाडे पाटील, अब्दुल गफार, रहिम खान, महेश देशमुख तरोडेकर, अजिज कुरेशी, मुन्ना अब्बास, बालाजी चव्हाण, श्रीनिवास मोरे, विठ्ठल पावडे, प्रल्हादराव ठगे, सतिश देशमुख तरोडेकर, कैलाश गोडसे, रमेश गोडबोले, सुरेश हटकर, सत्यपाल सावंत, बापूसाहेब पाटील, माधव पवळे, अतुल पेदेवाड, शंकर शिंदे, दिपकसिंग हुजुरिया, अंबादास रातोळे, गगन यादव, महेश मगर, संजय वाघमारे, डॉ.करुणा जमदाडे, राजन देशपांडे, रंगनाथ भूजबळ, इंजि. नसीम पठाण,
गणेश पाटील ढगे, महेश शिंदे, ज्योती कदम, अनिल कांबळे, प्रसेनजित वाघमारे, संदिपकुमार देशमुख, सुभाष किन्हाळकर, सुभाष लोणे, आदिनाथ चिंताकुटे, महेश शिंदे, शेख नईम, गौतम शिरसाट, शेख मुख्तार, गोविंद पाटील, गणेश पाटील, शेख लतिफ, नरोद्दीन शेख, एसपी कुंभारे, प्रकाश दिपके आदीसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
