वसमत (प्रतिनिधी)-औंढा ते वसमत रस्त्यावर काठोडा तांडा पाटीजवळ काल 6 आक्टोबर रोजी सायंकाळी दुचाकी आणि चार चाकी गाडीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकी वरील पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.
महामार्ग पोलीस मदत केंद्र येलकी जिल्हा हिंगोली यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास काठोड तांडा पाटीजवळ जवळून औंढा ते वसमत कडे जाणारी दुचाकी गाडी क्रमांक एम एस 26 2007 जे आणि वसमत कडून येणारी कार क्रमांक एम एच 12 एन इ 3803 या गाड्या समोरासमोर आल्या आणि कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने ती कार दुचाकी वर आढळली. दुचाकी वरील स्वार शेख एजाज शेख रहीम (30) आणि त्यांच्या पत्नी शेख नुरजहा बेगम शेख एजाज (27) राहणार अर्धापूर यांचा जागीच मृत्यू झाला.येलकी महामार्ग पोलीस मदत केंद्रातील पोलीस निरीक्षक पठाण, पोलीस उपनिरीक्षक अनमोल पोलीस अंमलदार खतीब आणि आडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त झालेल्या पती पत्नीला रुग्णालयात पाठवले. पण त्या दोघांचा अपघात स्थळीच मृत्यू झाला होता.
