पोलीसांवर जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-अवैध दारुची कार्यवाही करण्यासाठी दत्तबर्डी तांडा येथे गेलेल्या पोलीसांना सहा जणांनी मारहाण केल्याचा प्रकार 2 ऑक्टोबर रोजी दुपारी घडला आहे.
पोलीस उपनिरिक्षक गजानन सुदाम बरगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 3 वाजेदरम्यान पोलीस पथक मौजे दत्तबर्डी तांडा, नाईकनगर हदगाव येथे गेले होते. त्यांना तेथे सुरू असलेल्या अवैध दारु विक्री आणि उत्पादनाविरुध्द कार्यवाही करायची होती. या पोलीस पथकात पुरूष आणि महिला पोलीस यांच्यासह महिला होमगार्ड, पुरूष होमगार्ड सहभागी होते. तेंव्हा सरकारी काम करत असतांना मधुकर उर्फ मधु परशुराम राठोड, परशुराम रुपाजी राठोड, अनुसयाबाई परशुराम राठोड, वैभवी मधुकर राठोड, वैभव उर्फ अमर मधुकर राठोड, प्राची रोहिदास जाधव या सर्वांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पोलीस पथकास शिवीगाळ करून महिला होमगार्डला मारहाण करून दुखापत केली आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरिक्षक सुदाम बरगे यांना सुध्दा गंभीर दुखापत झाली आहे. हदगाव पोलीसांनी जीवघेणा हल्ला या सदरात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमात सहा जणांविरुध्द गुन्हा क्रमंाक 333/2025 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक नंद हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!