20 हजारांची लाच स्विकारणारा पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत मंजुर असलेल्या सुविधा देण्यासाठी कृषी विस्तार अधिकारी आणि अतिरिक्त पदभार कृषी अधिकारी विशेष घटक योजना पंचायत समिती हदगाव याने 20 हजार रुपये लाच स्विकारल्यानंतर आज विशेष न्यायाधीश आर.एम.शिंदे यांनी कृषी विस्तार अधिकाऱ्याला पोलीस कोठडीत पाठविले आहे.
एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरुन या प्रकरणाची लाच मागणी पडताळणी झाली. त्यानंतर 25 हजारांची मागणी आणि तडजोडीनंतर 20 हजार रुपयांची लाच स्विकारलेल्या बाळासाहेब पंडुलिकराव सुर्यवंशी या 52 वर्षीय विस्तार अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल रात्री नंदी हॉटेल चैतन्यनगर येथे अटक केली. आज पोलीस निरिक्षक रसुल तांबोळी, पोलीस अंमलदार रापतवार आणि प्रदीप खंदारे यांनी  पकडलेल्या बाळासाहेब सुर्यवंशीला विशेष न्यायालयासमक्ष हजर केले. याप्रकरणात सुर्यवंशीने अगोदरच्या योजनेत सेवा देतांना सुध्दा लाच घेलेली आहे. त्याचाही उल्लेख या कागदपत्रांमध्ये आहे. या प्रकरणातील तपासात उन्नती करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा मुद्दा सरकारी वकील ऍड. एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी मांडाला. न्यायाधीश आर.एम. शिंदे यांनी बाळासाहेब सुर्यवंशीला एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…

लाच घेताना कृषी विस्तार अधिकारी अटकेत – २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!