नांदेड(प्रतिनिधी)-डॉ. आंबेडकर नगर नांदेड येथील ज्येष्ठ उपासिका व सुजाता महिला मंडळ त्रिरत्न विहार सदस्या गीताबाई गोमाजी वाघमारे (98)यांचे बुधवारी 01 ऑक्टोंबर 2025 रोजी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले असून अंतयात्रा दि. 02 ऑक्टोंबर 2025 रोजी गुरुवारी सकाळी 09 वाजता राहते घर त्रिरत्न बौद्ध विहार नांदेड येथून निघणार असून वैकुंठधाम स्मशानभूमी सिडको नवीन नांदेड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बौद्धविधी उपासक समिंदर वाघमारे यांच्या त्या आई होत.
ज्येष्ठ उपासिका गीताबाई वाघमारे यांचे निधन
