नांदेड(प्रतिनिधी)-शेळगाव नृसिंह ता.देगलूर येथे एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने 28 वर्षीय व्यक्तीचा खून त्याच्या बहिणीची छेड काढल्यामुळे केला आहे.
अर्जुन परमेश्र्वर माटलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास मौजे शेळगाव नृसिंह येथे फिर्यादीमध्ये नामनिर्देशीत विधीसंघर्षग्रस्त बालकाने त्यांचा भाऊ संतोष परमेश्र्वर माटलवार (28) याचा खून केला आहे. याचे कारण असे आहे की, परमेश्र्वर माटलावारने विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या बहिणीची छेट काढली होती. देगलूर पोलीसांानी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 478/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक फड अधिक तपास करीत आहेत.
बहिणीची छेड काढणाऱ्या 28 वर्षीय व्यक्तीचा खून विधीसंघर्षग्रस्त बालकाने केला
