
नवीन नांदेड (प्रतिनिधी):गोदावरी नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होऊन जिल्हाभर नदीकाठ परिसरात पूर परिस्थिती उदभवली होती याच काळात शंकरराव चव्हाण जलाशय विष्णुपरी येथील गेट न 11 ला तांत्रिक अडचणी मुळे उघडता येत नव्हते ,ही बाब लक्षात येताच असर्जन येथील रगडे बंधूनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून गेटची दोरी बरोबर करून गेट पुर्वत सुरूळीत करून प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे त्यांचे अभिनंदन होत असुन राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील खंडेराव बकाल यांनी रगडे बंधुचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
राज्यात उद्भवलेली पूर परिस्थिती बघता गोदावरी नदीतील पाणीपत्रात अचानक वाढ झाली असून परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती, शंकरराव चव्हाण जलाशय विष्णुपुरी प्रकल्प नांदेड या ठिकाणाहून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडे करण्यात आले होते ,यातील 11 नंबरचा गेट काही कारणास्तव उघडत नव्हता कारण ,त्याला अडकविलेले लोखंडी रॉड पाण्यात चार ते पाच फूट खाली पाण्यात पडल्याने हा दरवाजा उघडत नव्हता ही गोष्ट लक्षात येताच असर्जन येथील रहिवासी असलेले उध्दव कोंडीबा रंगडे, मिथुन कोंडीबा रंगडे अंकुश कोंडीबा रंगडे अनिल कोंडीबा रगडे, मधुकर कोंडीबा रगडे यांनी धरणाचा 11 नंबर गेट नादुरुस्त झाल्याने प्रशासन चिंतेत होते,या बंधुनी जीवाची पर्वा न करता पाण्यात जाऊन तुटलेली दोरी चार ते पाच फूट खोल जाऊन बसविले व दरवाजा पुर्वत चालू करून दिल्यानंतर प्रशासनाने या गंभीर स्मस्येतुन सुटका झाली, ही वार्ता गावात कळताच राज्य पोलीस प्राप्त पोलीस पाटील पोलीस पाटील खंडेराव बकाल यांनी विष्णुपुरी प्रकल्प येथे जाऊन रगडे बंधुचा सत्कार केला ,रगडे बंधु यांनी एवढ्या पाण्याचा प्रवाह चालू असताना सुद्धा रगडे बंधूंनी दाखवलेल्या या कामगिरी बद्दल प्रशासनाने त्यांचे कौतुक केले असून, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या, यावेळी असर्जन गावातील ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
