नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे पत्रकार भवनावर अतिक्रमण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द पत्रप्रबोधीनीमधील एका वरिष्ठ पत्रकाराच्या तक्रारीवरुन गुन्हा तर दाखल झाला. पण वेगवेगळ्या पत्रकारांकडे जमा असलेल्या रक्कमेचा हिशोब कसा होईल, त्याची तक्रार कोणी करावी हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला आहे.
सिडको भागात अत्यंत तातडीने स्थापन करण्यात आलेल्या पत्रप्रबोधनी या संस्थेला महाराष्ट्र शासनाने 10 हजार चौरस फुटापेक्षा मोठा भुखंड मोफत दिला. त्यावर कोणी आजपर्यंत लक्षच दिले नाही. नंतर काही जमीन माफीयांनी यावर डाव खेळला आणि छोटेसे शेड बांधून देवाची मुर्ती बसवली. या बाबत सर्वपत्र वास्तव न्युज लाईव्हनेच आवाज उठविला होता. त्यानंतर काल दि.25 सप्टेंबर रोजी वरिष्ठ पत्रकार प्रल्हाद गणपतराव उमाटे (63) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 सप्टेंबर 2025 रोजी सिडको भागातील नियोजित पत्रकार भवनाची नामफलकाची तोडफोड करून काढून टाकले. तसेच तेथे छोटे पत्राचे शेड उभे करून देवाची मुर्ती बसविण्यात आली आहे आणि असे अतिक्रमण झाले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 923/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार मोरे अधिक तपास करीत आहेत.
पत्रकार भवनाच्या जागेचा आवाज त्या पत्र प्रबोधीनीमध्ये सदस्य नसतांना सुध्दा वास्तव न्युज लाईव्हने उठविला. त्यानंतरच वरिष्ठ पत्रकारांना जाग आली आणि अतिक्रमणाचा गुन्हा दाखल झाला.पत्रकार भवनासाठी जागा शासनाने उपलब्ध करून दिली तेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना माहित होते की, पत्रकारांच्या वेगवेगळ्या संघटनांकडे वेगवेगळ्या मुख्यमंत्री काही लाख रुपये निधी दिलेला आहे. ती बाब पत्रकारांनीच त्यांना सांगितली होती. म्हणून ज्यांच्या-ज्यांच्याकडे पैसे आहेत. त्यातील एक वगळता सर्वांची नावे या पत्रप्रबोधीनीमध्ये घेण्यात आली. पण दुर्देवाने अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री पद गेले आणि पुढील निधी मिळाला नाही. पत्रकारांकडे जो निधी उपलब्ध आहे. त्यातून या भुखंडावर पुर्ण पत्रकार भवन उभे राहणार नसेल पण आराखाड्याप्रमाणे तळमजल्यावर व्यावसायीक गाळे, पहिल्या मजल्यावर पत्रकार भवनाचा मोठा हॉल आणि दुसऱ्या मजल्यावर पत्रकारांसाठी विश्रामगृह नियोजित आहे. त्यातील व्यावसायिक गाळे तर पत्रकारांकडे आहेत. त्या निधीमध्ये सुध्दा तयार होवू शकेल. पण ते पैसे कोणा-कोणाकडे आहेत. त्याचा उपयोग त्यांनी काय केलेला आहे. पैसे मिळाल्याची तारीख आणि आजचा दिवस मोजला तर ते पैसे दहा पट व्हायला हवे आहेत. पण याबाबत प्रश्न विचारणार कोण आणि याचे उत्तर देणार कोण आणि सर्वात मोठा विषय हा आहे की, त्या पैशांचा दुरूपयोग होत असेल तर त्यावर कार्यवाही करणार कोण ? असा आहे पत्रकार भवनाचा कारभार.
संबंधीत बातमी…
पत्रकार संघटनेच्या सिडकोमधील 10 हजार चौरस फुटाच्या भुखंडावर अतिक्रमण
