सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षकांची ऑनलाईन फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 97 हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे.
नाईकनगर नांदेड भागात राहणारे सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक नामदेव मष्णाजी मिठेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 9 वाजेदरम्यान ते घरी असतांना त्यांच्या सहमतीशिवाय त्यांचे बॅंक ऑफ बडोदा व पंजाब नॅशनल खात्यातून कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 97 हजार रुपयंाची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीसांनी भारतीय न्याय संहिता आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलमानुसार गुन्हा क्रमांक 385/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक माळी यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!