नांदेड(प्रतिनिधी)-कनकी तांडा ता.किनवट येथून एका चोरट्याने शेतातील मोटार पंप आणि वायर असा 19 हजार रुपयांचा वायर चोरला.
गणेश सखाराम राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 सप्टेंबरच्या सकाळी 8.30 ते 23 सप्टेंबरच्या रात्री 8 वाजेदरम्यान कनकी तांडा शेत शिवारातील त्यांच्या विहिरीवरील मोटार पंप व वायर असा 19 हजारांचा ऐवज त्याच गावातील उमेश कनीराम राठोड (31) याने चोरला आहे. किनवट पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 87/2025 दाखल केला आहे. महिला पोलीस अंमलदार कनाके अधिक तपास करीत आहेत.
मोटार पंप चोरी
