विष्णुपूरी प्रकल्पाचे 15 दरवाजे उघडले; पुर परिस्थितीचा संभाव्य धोका

नांदेड(प्रतिनिधी)-मागील चार दिवसापासून राज्यात पावसाने अक्षरशाः धुमाकुळ घातला. पुढील 48 तासात अनेक भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा मुंबई-कुलाबा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे नांदेड शहरातील गोदावरी नदीवर असणार्‍या विष्णुपूरी प्रकल्पाचे तब्बल 15 दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
राज्यातील पुरपरिस्थिती लक्षात घेता व पावसाचा जोर कायम असल्याने मराठवाड्यातील जायकवाडीसह माजलगाव, येलदरी, सिध्देश्र्वर यासह अन्य प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. यातच जायकवाडी धरणातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने विष्णुपूरी प्रकल्पाचे तब्बल 15 दरवाजे उघडण्यात आले असून 1 लाख 81 हजार क्युसेस वेगाने पाणी गोदावरी पात्रात सोडले जात आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हा पाण्याचा वेग सर्वाधिक आहे. जलसंपदा विभागाने किमान 2 लाख क्युसेस वेगाने पाणी नदीपात्रात सोडणे अपेक्षीत आहे. एकंदरीत नांदेड जिल्ह्यात संभाव पुर परिस्थितीचा धोका लक्षात घेवून जिल्हा प्रशासन यावर नजर ठेवून आहे. आपत्ती व्यवस्थापनाला ही सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात पाऊस होत असल्याने गोदावरी नदीला महापुर आला आहे. आगामी 48 तासात वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकंदरीत गोदावरी नदीला महापुराचा धोका वर्तविण्यात आला असल्याने महापालिका प्रशासनानेही सतर्कत राहिले असून शहरात सहा ठिकाणी तात्पुर्त्या स्वरुपाचे सहा निवारा केंद्र स्थापन केले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!