नांदेड(प्रतिनिधी)-काल 18 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलाची मासिक गुन्हे परिषद पार पडली. या संदर्भाने दिव्य शक्तीने दिलेल्या ताकतीनुसार माहिती प्राप्त झाली आहे की, पोलीस अधिक्षकांनी नांदेड ग्रामीण आणि हदगाव पोलीस ठाण्याच्या संदर्भाने अत्यंत कडक ताशेरे ओढतांना Eye Wash असे शब्द वापरले आहेत. शब्द इंग्रजीत असले तरी अत्यंत बोचक आहेत.
काल गुन्हे परिषद पार पडली तेंव्हा हदगाव पोलीस ठाण्याबद्दल आपले मत व्यक्त करतांना पोलीस अधिक्षक सांगत होते की, हदगाव पोलीस ठाण्याचा कारभार अत्यंत दयनिय अवस्थेत आहे. दयनिय अवस्था कशी असते. कारण पोलीसांकडे तर भरपूर अधिकार असतात. ताकत असते आणि तरी सुध्दा दयनिय म्हणजे बाब अवघड आहे. आता कोणत्या विषयाच्या अनुशंगाने असे बोलण्यात आले याचा माग मात्र मिळाला नाही. पण पुढे हदगाव पोलीस ठाण्याच्या कारभारात पुढच्या मासिक गुन्हे परिषदेअगोदर सुधारणा होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. हदगाव पोलीस ठाणे हे तालुक्याचे पोलीस ठाणे आहे. त्या ठिकाणी पोलीस निरिक्षक पद मंजुर आहे. तरी पण तेथे नियुक्ती मात्र सहाय्यक पोलीस निरिक्षकाची आहे. हदगाव पोलीस ठाण्याच्या संदर्भाने Eye Wash या इंग्रजी शब्दाचा वापर केला. शब्द इंग्रजी असला तरी पण अत्यंत बोचक शब्द आहे हा.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुलै महिन्यात पद्मजा सिटी या वसाहतीत एक चोरी झाली. त्यात चोरीला गेलेला ऐवज जवळपास 50 लाखांचा आहे. या ठिकाणी पोलीसांकडे कोणताही सुगावा नव्हता. तरी पण सुतावरुन स्वर्ग गाठल्याप्रमाणे पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. त्यातील लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. खऱ्या अर्थाने हे बेस्ट डिटेक्शन आहे. त्यांनाही पुरस्कार देण्यात आला. परंतू पोलीस अधिक्षकांचे शब्द या संदर्भाने असे आहेत की, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदारांचा या चोरीत सहभागी असेल असे त्यांना वाटते. गंभीर बाब आहे. पण या प्रकरणातील आरोपी शफी बिल्डर आहे आणि तो चोर आहे हे सर्वच पोलीसांना माहित होते. पण तो जुगार अड्डा चालवायचा, तो जुगार अड्डा अत्यंत मोठ्या स्वरुपाचा होतो. काही रक्तदान शिबिरांचे कार्यक्रम घेवून तो व्हाईट कॉलर बनण्याच्या मागे लागला होता. त्याचे नेत्यांसह आणि पोलीस अधिकाऱ्यांसह फोटो सुध्दा आहेत. बहुदा म्हणून शफी बिल्डरच्या हालचालीकडे नांदेड ग्रामीण पोलीसांचे लक्ष गेले नसेल. शेवटी पोलीस सुध्दा माणसेच आहेत. म्हणूनच माणसाकडून चुक होते. हे सुध्दा तेवढेच सत्य आहे.
मासिक गुन्हे परिषदेमध्ये नांदेड ग्रामीण आणि हदगाव पोलीस ठाण्यांची खरडपट्टी
