नांदेड( प्रतिनिधी)–ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव वेगातील ट्रक काळी पिवळी जीपवर जोरदार धडकला. या अपघातात जीपमधील ७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना १७ सप्टेंबर रोजी मुखेड तालुक्यातील वाऱ्हाळी नाका येथे घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी, मुखेड तालुक्यातील वाऱ्हाळी नाका येथिल मुख्य रस्त्यावरून १७सप्टेंबर रोजी दुपारी एमएच ०६ एक्यू ६२४९ हा मालवाहू ट्रक भरधाव वेगात निघाला होता. मात्र नाक्याजवळ येताच ट्रकचे ब्रेक फेल झाले, त्यामुळे काही कळण्याआधी तो ट्रक येथे असलेल्या काळी पिवळी जीपवर जोरदार धडकला. त्यावेळी एकच गोंधळ उडाला, धावपळ उडाली. या गंभीर अपघातात जीपमध्ये असलेले ७ ते ८ प्रवासी यात गंभीर जखमी झाले. जखमींना मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल आले करण्यात आहे. दरम्यान वृत्त लिहीपर्यंत अपघातामधील जखमींनी नावे कळू शकली नाहीत. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,245 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्वारातीम विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन उद्या होणार गौरव न्या. अनंत बदर समितीला दिलेली अनावशक मुदतवाढ तात्काळ रद्द करा : सकल मातंग समाजाचे पालकमंत्र्यांना निवेदन