नांदेड( प्रतिनिधी)–ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव वेगातील ट्रक काळी पिवळी जीपवर जोरदार धडकला. या अपघातात जीपमधील ७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना १७ सप्टेंबर रोजी मुखेड तालुक्यातील वाऱ्हाळी नाका येथे घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी, मुखेड तालुक्यातील वाऱ्हाळी नाका येथिल मुख्य रस्त्यावरून १७सप्टेंबर रोजी दुपारी एमएच ०६ एक्यू ६२४९ हा मालवाहू ट्रक भरधाव वेगात निघाला होता. मात्र नाक्याजवळ येताच ट्रकचे ब्रेक फेल झाले, त्यामुळे काही कळण्याआधी तो ट्रक येथे असलेल्या काळी पिवळी जीपवर जोरदार धडकला. त्यावेळी एकच गोंधळ उडाला, धावपळ उडाली. या गंभीर अपघातात जीपमध्ये असलेले ७ ते ८ प्रवासी यात गंभीर जखमी झाले. जखमींना मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल आले करण्यात आहे. दरम्यान वृत्त लिहीपर्यंत अपघातामधील जखमींनी नावे कळू शकली नाहीत. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.
More Related Articles
हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्डा उपमहानिरीक्षक यांच्या पथकाने उध्वस्त केला
नांदेड परिसरात कारवाई करत जुगार अड्डा व अवैध रेती वाहतूक प्रकरणात एकूण सुमारे 32 लाख…
विधानसभेसाठी जिल्ह्यात 9 मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 अर्ज दाखल ; भोकर मतदार संघात सर्वाधिक उमेदवारी अर्ज
*लोकसभा पोट निवडणुकीसाठी 56 अर्ज दाखल* • *मंगळवारी शेवटच्या दिवशी विधानसभेसाठी 288 इच्छुकांचे 388 अर्ज…
नांदेड जिल्हा पोलीस दलातून आज 30 जण सेवानिवृत्त
एक एपीआय, पाच पीएसआय, सात श्रेणी पीएसआय, कार्यालय अधिक्षक, वरिष्ठ श्रेणी लिपीक, दहा पोलीस अंमलदारांचा…
