नांदेड(प्रतिनिधी)-28 हजार रुपयंाची लाच स्विकारणाऱ्या महानगरपालिकेतील गुंठेवारी विभागात कार्यरत कंत्राटी स्थापत्य उपअभियंत्याला दुसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
15 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेत कार्यरत आणि गुंठेवारी विभागाचे काम पाहणाऱ्या स्थापत्य उपअभियंता विजय शेषराव दवणे यास 28 हजारांची लाच घेतल्यास पकडले. वजिरबाद पोलीस ठाण्यात या संदर्भाने गुन्हा दाखल झाला होता. आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरिक्षक अनिता दिनकर, सहाय्यक पोेलीस उपनिरिक्षक एस.व्ही. वडजे, पोलीस अंमलदार गोरपले, प्रदीप खंदारे यांनी अटकेत असलेल्या विजय दवणेला न्यायालसमक्ष हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी या प्रकरणात आश पध्दतीने लाच घेवून किती गुंठेवारी संचिका क्लिअर केल्या आहेत. याचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा न्यायालयासमक्ष मांडला. न्यायालयाने कंत्राटी स्थापत्य उपअभियंत्याला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…
मनपाचा स्थापत्य उपअभियंत्याला 30 हजारांची लाच स्विकारल्यानंतर अटक
