नांदेड(प्रतिनिधी)-काल दुपारी वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांचा भाऊ केशव सातपुत यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडल्यानंतर रात्री 10 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.यामध्ये चार आरोपींच्या नावासह इतर सहा जण आरोपी असल्याचे लिहिलेले आहे. आरोपीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा नातलग सुध्दा समाविष्ट असल्याची चर्चा आहे. सोबतच या प्रकरणातील दोन जणांना भरपूर मारण्यात आले आहे. त्यातील एकाला 42 टाके लागले आहेत. त्याचा जबाब अजून पोलीसांनी नोंदवलेला नाही. हा प्रकार सुध्दा पोलीस अंमलदार बालाजी सातपुतेच्या घरासमोरच घडलेला आहे. हा काय प्रकार आहे. याचा शोध नांदेड ग्रामीण पोलीसांनी घेवून सत्य उघडकीस आणावे अशी चर्चा विष्णुपूरी गावात होत आहे.
उदय व्यंकटराव सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे दोन भाऊ बालाजी सातपुते आणि केशव सातपुते हे एकत्र राहतात. बालाजी सातपुतेचा मुलगा नागार्जूना शाळेत 8 व्या इयत्तेचा विद्यार्थी आहे. या वर्गातील दुसऱ्या एका मुलासोबत त्याचे काही तरी भांडणे झाले. तेंव्हा मुलांपैकी दोन जण 14 सप्टेंबरच्या दुपारी त्यांच्या घरी आले आणि बालाजी सातपुतेच्या मुलाला बळजबरीने दुचाकीवर बसवून घेवून जाऊ लागले. तेंव्हा आम्ही विरोध केला. त्यानंतर आणखी काही जण आले आणि त्यांनी तलवारीने आम्हा तिन्हे भावांवर जिवघेणा हल्ला केला. यानुसार हा गुन्हा क्रमांक 891/2025 दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीमध्ये आरोपींची नावे आहेत परंतू वय माहित नसल्यामुळे आम्ही ती लिहित नाही. कारण विधीसंघर्षग्रस्त बालकांची नावे लिहिता येत नाहीत.
नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात दोन बालकांवर उपचार सुरू आहेत. त्यातील एका बालकाला 42 टाके लागलेले आहेत. काल 14 सप्टेंबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीस त्या बालकाचा जबाब घेण्यासाठी गेले होते. परंतू तो बेशुध्द होता. म्हणून हा प्रकार फक्त शाळेतील भांडण घरी आले असा आहे की, त्यापेक्षा मोठे काही यात आहे याचा शोध घेवून सत्य समोर आणण्याची जबाबदारी नांदेड ग्रामीण पोलीसांची आहे. काही जण सांगतात मारहाण होत असतांना तलवार वाकडी झाली होती.
संबंधीत बातमी..
वजिराबादमधील पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांच्या बंधूवर जिवघेणा हल्ला
