नांदेड(प्रतिनिधी)-कंधार येथे ट्रक उलटून स्वस्त धान्याचा तांदुळ रस्त्यावर पडल्यानंतर त्यासंदर्भाने जीवनावश्यक वस्तू अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बहुदा ट्रक चालकाला आरोपी करण्यात आले आहे.
निरिक्षक अधिकारी (पुरवठा) तहसील कार्यालय कंधार यांनी तक्रार दिली की, 12 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्यासुमारास फुलवळ टोलनाक्याजवळ ट्रक क्रमांक पी.बी.04 ए.एफ.8448 उलटला. त्यात 299 क्विंटल तांदुळ होते. ज्याची किंमत 11 लाख 60 हजार 120 रुपये आहे. तसेच 25 लाखांचा ट्रक पोलीसांनी ताब्यात घेतलेला आहे. या प्रकरणता बराच मोठा घटनाक्रम घडला. पण अखेर या प्रकरणी परमेश्र्वर उर्फ रामेश्र्वर काशिनाथ जाहीर (45) रा.लिंबोटी ता.लोहा जि.नांदेड या चालकाविरुध्द गुन्हा क्रमांक 312/2025 दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कवाळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
संबंधीत बातमी…
ट्रक उलटून स्वस्त धान्याचा तांदुळ रस्त्यावर आज ही गुन्हा दाखल नाही; काही पत्रकारांनी खाल्ले ‘मोदक’
