नांदेड(प्रतिनिधी)- जुना मोंढा ते सिडको ऍटोतून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीच्या बॅगमधील 50.210 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट चोरीला गेले आहे. कृष्णूर येथील टाटा केमिकल्समधून विविध प्रकारचे 99 हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे.
जळबा केरबा काळेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास जुना मोंढा ते सिडको असा ऍटोरिक्षात प्रवास करत असतांना त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये ठेवलेले 50.210 मिलिग्रॅम सोन्याचे बिस्कीट 5 लाख 50 हजार 360 रुपयांचे कोणी तरी चोरून नेले आहे. इतवारा पोलीसांनी या बाबत गुन्हा क्रमांक 292/2025 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
एमआयडीसी कृष्णूरमध्ये टाटा केमिकल्स लि.चे गोविंद मारोती नरंगले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 सप्टेंबरच्या रात्री 1 ते पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांच्या कारखाना परिसरात ठेवलेले तार व लाईटच्या डिपीतील तांबे 350 किलो वजनाचे 65 हजार रुपये किंमतीचे डी.पी.मधील ऑईल 700 लिटर 29 हजार रुपयांचे, डि.पी.स्विच 5 हजार रुपयांचे असा एकूण 99 हजार रुपयांचा ऐवज कोणी तरी चोरून नेला आहे. कुंटूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 217/2025 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
5 लाखांपेक्षा जास्त किंमतीचे सोन्याचे बिस्कीट चोरले ; टाटा कंपनीच्या साहित्याची चोरी
