नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 2 वाजता हस्सापूर रस्त्यावर दोन टेम्पोची तपासणी केली तेंव्हा त्यात 10 गोवंश बांधलेले होते. पोलीसांनी या प्रकरणात गोवंश आणि टेम्पो असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख राजू वटाणे, त्यांचे सहकारी परिवेक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक सुनिल बुलंगे, पोलीस अंमलदार सोनटक्के, नंदे, येमेकर हे गस्त करत असतांना रात्री 2 वाजेच्यासुमारास हस्सापूर भागातून जाणारे टेम्पो क्रमांक एम.एच.22 ए.एन.4342 आणि एम.एच.04 जे.बी.8766 थांबवून त्याची तपासणी केली. त्यामध्ये 10 गोवंश बांधलेले होते. या प्रकरणी वजिराबाद पोलीसांनी शेख सोहेल शेख रफीक (23), नसिर बशीर कुरेशी (30), मिरसाब अब्दुल शेख (31), तिघे खुदबईनगर नांदेड, सरवर गौस मोहम्मद कुरेशी (37) रा.बिलालनगर नांदेड, रिजवान कुरेशी रा.नांदेड, उमर कुरेशी रा.परभणी अशा सहा जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 389/2025 दाखल केला आहे. पोलीस उपअधिक्षक रामेश्र्वर व्यंजने, पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांनी पोलीस पथकाचे या कामासाठी कौतुक केले आहे.
वजिराबाद पोलीसांनी 10 गोवंश पकडले
