भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच होणार म्हणजे पुलवामा आणि पहलगाम हल्ला पाकिस्तानने केलेला नाही काय?

आज भारतामध्ये प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही या सदराखाली ठेवून त्यांची बदनामी केली जाते. पण जगात जुन्या काळात शास्त्रार्थ होत होता. त्याद्वारे विद्वानाचे विचार, त्यावर आक्षेप, तर्क, वितर्क आणि कुतर्क केले जात होते आणि त्यानंतर जनतेसाठी काय चांगले आहे याचा बोध निघत होता. आजच्या जीवनात सुध्दा आम्हाला तर्काच्या आधारावरच बोलले पाहिजे. परंतू या महिन्यात होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यामुळे पुलवामा आणि पहलगाम येथे पाकिस्तानने हल्ला केला नव्हता काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण पुलवामानंतर एअर स्ट्राईक आणि पहलगामनंतर ऑपरेशन सिंदुर राबवून दाखवले हेच गेले की, ते दोन्ही हल्ले पाकिस्तानने केले आहेत. ज्यामध्ये 40 भारतीय सैनिक आणि 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे. कोणाच्याही घरातील एखाद्या व्यक्तीचा खून झाला तर कुटूंबिय अशी मागणी करतात की, दोषी व्यक्तीला दंड व्हावा, त्याला फाशी व्हावी, शिक्षा लागावी. पुलवामा आणि पहलगाम हल्यात भारतीय नागरीकांची अशी इच्छा असेल तर ती तर्काशिवाय आहे काय? आणि तर्क करणाऱ्यांना दोषी मानले जाते. राष्ट्रवादाच्या नावावर देशद्रोह होत आह ेअसे सांगून तर्क करणाऱ्यांवर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. याचेच मला दु:ख वाटते असे मत पब्लिक इंडियाचे प्रा.अखिल स्वामी यांनी व्यक्त केले आहे.


प्र्रा. अखिल स्वामी सांगतात, एखादा माणूस जास्त चालाखी, जास्त खोटेपणा आणि जास्त कटांचा वापर करत असेल तर तो स्वत:च कधी तरी त्यात फसतो. असेच आपल्या शेजारच्या देशात घडत आहे. फ्रान्समध्ये सुध्दा असेच घडले आहे. श्रीलंका-बांग्लादेश-पाकिस्तान-नेपाळ या देशांमध्ये सुध्दा असे घडत आहे. सत्ता जेेंव्हा जनतेला राष्ट्रवादाचे स्वप्न दाखवून अंधारत ठेवते. तसेच धर्म आणि देशाच्या नावावर भ्रमीत करते या पध्दतीने काही दिवस त्या लोकांची सत्ता नक्कीच चालते परंतू असे करणाऱ्यांना तसेच भोगावे लागते. जे ईतिहासात सुध्दा अनेकांनी भोगलेले आहे. जो व्यक्ती ज्या देशाचे मिठ खातो. त्याची आपल्या देशासोबत निष्ठा नक्कीच असते. परंतू तो तर्कांच्या आधारांवर बोलणार नाही, मुर्ख राहावा, सरकारच्या शब्दांवर प्रश्न उपस्थित करू नये. असा देखावा तयार करण्याच्या प्र्रयत्नात सरकारच उघड पडत असते. आणि प्रश्न विचारणारा देशद्रोही ठरतो. बांग्लादेशात हिंदुवर अत्याचार झाला, श्रीलंकेत हिंदु, मुस्लीम आणि ख्रिचनांवर अन्याय झाला, जर्मनीमध्ये यहुदींवर अन्याय झाला. आज ही फॅशन झाली आहे काय की अल्पसंख्यांवर अन्याय करा आणि राजकीय फायदे उचलत राहा. आजच्या परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये सुध्दा भारतीयांसोबत अन्यायच होत आहे. फिनलंडमध्ये तर हिंदुंवर अन्याय करून तेथून त्यांना पळवून लावण्याचा प्र्रयत्न होत आहे. म्हणूनच पुर्वीच्या काळात शास्त्रार्थाला महत्व होते.
सरकारने एखादी गोष्ट जाहीर केली आणि त्याची पुष्टी सैन्याकडून करायला लावली आणि त्यावर जर कोणी प्रश्न विचारला तर तो राष्ट्र विरोधी आहे, देशाप्रती कर्तव्यनिष्ठ नाही असे सांगितले जाते. भारतात 85 टक्के हिंदु आहेत आणि 12 टक्के मुस्लिम आहेत. काही दिवसांपुर्वी पुराने घातलेल्या थैमानामुळे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीत सर्वाधिक मदत मुस्लिम समाजाने केली. असा प्रचार पंजाबमधील सिख समुदाय करत आहे. या पुर्वाच्या परिस्थितीत त्या संस्था आणि ते एनजीओ कोठेच दिसले नाहीत जे आम्हीच या देशातील राष्ट्रवादाचे प्रतिक आहोत असे दाखवत आहेत. पंजाबमध्ये सिख व मुस्लिम धर्मीयांनी हिंदुसोबत चांगलाच व्यवहार केला आहे. कारण त्या ठिकाणी हिंदु अल्पसंख्याक आहेत. परंतू राजकीय उनमाद वाढवून सत्तेत जाण्याचा मार्ग शोधणाऱ्यांना पंजाब राज्यात मात्र आपले बसस्थान बसविता आले नाही.
सैन्याचे अधिकारी, नेते हे माणूसच आहेत आणि चुक माणसाकडूनच होत असते आणि त्यामुळेच तर्कांची गरज आहे. न्युटनच्या डोक्यावर सफरचंद पडले. तसे सफरचंद अनेकांच्या डोक्यावर पडले असेल. परंतू त्यांनी विचार केला नाही. पण न्युटनने विचार केला. की, सफरचंद झाडावरून खालीच का पडले, वर का गेले नाही आणि या तर्काला न्युटनने संशोधनाची जोड दिली आणि त्यातून गुरूत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. पुलवामा आणि पफलगाम हल्याच्या संदर्भाने सुध्दा अशाच तर्काचा विचार होण्याची गरज आहे. भारतीय सैन्याने हवाई जहाज मागितले होते. परंतू ते मिळाले नाही. रस्त्यावरून त्यांना देतांना त्यांच्या ताफ्यात एक गाडी घुसली. ज्यामध्ये 350 किलो आरडीएक्स होते आणि त्याचा स्फोट होवून 40 जवानांचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेच एक एअरस्ट्राईक करण्यात आले आणि आम्ही बदला घेतला असे सांगण्यात आले. आज पुलवामा हल्याला सहा वर्ष झाली आहेत. पण त्याचा तपास काही लागलेला नाही. त्यावेळी हिंदु-मुस्लिम नॅरेटीव्ह वापरून मतदान मिळविण्यात आले. कारण पाकिस्तानचे नाव आले की, मुस्लिमांचे नाव येतच हा सुध्दा तर्कच आहे. पहलगाम हल्यात 200 किलो मिटर दुर देशाची सिमा असतांना तीन आतकंवादी आत आले आणि अडीच हजारांच्या पर्यटक जमावावर त्यांनी गोळीबार करतांना धर्म विचारला. याचाही खुप प्रचार झाला. त्या हल्यात मारल्या गेलेल्या पतीच्या पत्नींनी जाहीरपणे सांगितले होते की, या प्रकरणात हिंदु-मुस्लिम हा वाद न करता दोषींना मृत्यूदंड द्या. पण आज 4 महिने झाले ते तिन अतिरेकी हल्ला करून 200 किलो मिटर लांब असलेली बॉर्डर पार करून परत गेले आहेत. त्यांना पकडले गेले नाही. त्यावेळी करण्यात आलेले हिंदु-मुस्लिम नॅरेटीव्ह व्हावे हे पाकिस्तानची इच्छा होती. जेणे करून भारतात असंतोष माजेल, भारत पोखरला जाईल. तरी पण एका राजकीय पक्षाने हेच नॅरेटीव्ह वाढवले.
म्हणूनच प्रा.अखिल स्वामी सांगतात की, आम्हाला प्रत्येक गोष्टींचा विचार तर्कांवर करायला हवा. डोळे बंद करून नव्हे. एअर स्ट्राईक झाले तेंव्हा विचारणा करण्यात आले की, किती मारले, काय केले तर तुम्ही सैन्याविरुध्द बोलत आहात म्हणजे देशद्रोही आहात असे सांगितले गेले, ऑपरेशन सिंदुरमध्येक सुध्दा प्रश्न विचारल्यानंतर हाच प्रत्यय आला. सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणजे आम्ही का विश्र्वास करावा? युपीए सरकार होती तेंव्हा मुंबईवर हल्ला झाला. त्याचीही खिल्ली उडविण्यात आली. डोजिअर -डोजिअर खेळत होते. हल्ला का केला नाही असे विचारले जात होते. पण डोजिअर म्हणजे पुरावे. त्यावेळेस ते पुरावे भारत सरकारने फक्त पाकिस्तानला दिले नाही तर ते जगाला दिले. त्यामुळे त्यावेळेस संपुर्ण जग भारतासोबत होत. म्हणजे पुराव्याशिवाय आपला आरोप सिध्द करता येत नसतो. यंत्रणाच राबवली नाही, तपासच केला नाही. म्हणून 66 मृत्यूंची कारणे सापडली नाहीत. फक्त सरकारच्या तर्कावर हा हल्ला पाकिस्तानने केला असे आपण मानून घेवू. तरी पण त्या पाकिस्तानसोबत याच महिन्यात क्रिकेट सामना भारत खेळणार आहे. ज्या देशाने आमच्या देशात 66 मृत्यू घडविले. त्या देशासोबत क्रिकेट खेळले नाही तर देशाचे काही नुकसान होणार नव्हते. पण आता असे म्हणायचे काय? या दोन्ही हल्यांमध्ये पाकिस्तानचा हात नव्हताच? आणि म्हणूनच तुम्ही क्रिकेट त्यांच्यासोबत खेळणार आहात.
यावर सरकार उत्तर देते की, आम्ही पाकिस्तानसोबतचा पाणी करार रद्द केला. तर पाकिस्तानने शिमला करार रद्द केला. तुम्ही अशा दुष्ट राष्ट्रासोबत क्रिकेट खेळणार आहात. याचा अर्थ असा होत नाही काय? पुलवामा आणि पहलगाम हल्यामध्ये पाकिस्तानचा हात नव्हता. मग हे खरे असेल तर मग कोणाचा हात होता. काही दिवसांपुर्वीच चिनसोबत मैत्रीचा गवगवा होत आहे. काही दिवसांपुर्वीच चिनला दोष दिले जात होते. त्या चिनसोबत मैत्री करताय ज्या चिनने ऑपरेशन सिंदुरमध्ये पाकिस्तानला मदत केल्याची माहिती सैन्य अधिकाऱ्यांनी जाहीर केली. तुर्कस्थानच्या राष्ट्रपतीसोबत गळा भेट घेता. ज्या तुर्कस्थानने ऑपरेशन सिंदुरच्यावेळेस पाकिस्तानला ड्रोन पुरविले. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधणे भारतीय नागरीकांचे काम नाही काय? विचार करणे, त्या विचाराल समजून घेणे आणि त्यानंतर त्यावर बोलणे हाच आमचा खरा राष्ट्रवाद आहे. धर्म हा व्यक्तीगत मुद्दा आहे आणि माझ्या धर्मामुळे मी इतर धर्मियांना त्रास देवू शकत नाही. म्ळणूनच प्रा.अखिल स्वामी यांना चिंता वाटते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!