नांदेड(प्रतिनिधी)-इतरांचा गळा केसाने अर्थात शब्दाने कापणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेचा गळा कापण्याचा प्रकार सिडको भागात घडत आहे. 10 हजार चौरस फुट जागेवर कोणी तरी कब्जा मारण्याचा प्रयत्न करत आहे. पण इतरांचे शोधून-शोधून लिहिणाऱ्या पत्रकारांना आपले काय चोरीला जात आहे हेच दिसत नाही. विशेष म्हणजे ही जागा मुख्यमंत्री असतांना अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे. सोबतच काही पत्रकारांकडे आजही लाखो रुपये व्यक्तीगतरित्या पडून आहेत. ते पत्रकार संघटनेसाठी आहेत. त्या लाखो रुपयांचे काय झाले.
2008 मध्ये अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असतांना सिडकोमध्ये पत्रकार संघटनेसाठी जागा देण्याचे ठरले. पण त्यासाठी कोणतीही संस्था अस्तित्वात नव्हती आणि होत्या त्या संघटनांमध्ये वाद होते. पण पत्रकार हे कलाकारच असतात. त्यांनी कलाकारी केली आणि पत्रकार प्रबोधिनी नावाची एक संस्था त्वरीत नोंदणी केली. त्यावेळी सिडको कार्यालयासाठी राखवी ठेवलेल्या 10 हजार चौरस फुटाचा भुखंड अशोक चव्हाण यांनी पत्रकार प्रबोधिनीला दिला. आज जवळपास 17 वर्ष होत आली आहेत. पण या जागेवर पत्रकर प्रबोधिनीच्या मालकीची जागा असा बोर्ड सुध्दा नाही.
या पत्रकार प्रबोधिनीमध्ये सन्माननिय कृष्णाभाऊ शेवडीकर, सन्माननिय शंतनु डोईफोडे, सन्माननिय प्रल्हाद उमाटे, अति सन्माननिय संजीव कुलकर्णी आणि त्यांच्याही पेक्षा मोठे सन्माननिय डॉ. दिपक शिंदे हे सदस्य आहेत. यातील कृष्णा शेवडीकर, संजीव कुलकर्णी आणि डॉ.दिपक शिंदे यांच्याकडे लाखो रुपये पत्रकार संघटनेच्या नावावर शासनाकडून घेतलेले आहेत. त्या पैशांचा हिशोब तर कधीच संघटनेला दिलेला नाही. आणि आजच्या तर कार्यान्वीत असलेल्या पत्रकारांना ही पत्रकार प्रबोधिनीसुध्दा माहित नाही. अजूनही एका पत्रकाराकडे असेच लाखो रुपये आहेत. पण त्याचे नाव सांगण्यासाठी माहितगाराने नकार दिला.
अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेंव्हा या 10 हजार चौरस फुट जागेस 5 कोटी रुपये वेगळे पण देणार होते. त्यासाठी त्याचा प्रारुप आराखडा अत्यंत जलदगतीने तयार करण्यात आला होता. त्यामध्ये तळमजल्यावर दुकाने असतील. ज्यामुळे पत्रकार प्रबोधिनीला उत्पन्न मिळेल. पहिल्या मजल्यावर हॉल तयार होणार होता आणि दुसऱ्या मजल्यावर विश्रामगृह पण आज 17 वर्षापासून ती जागा पत्रकार प्रबोधिनीची वाट पाहत आहे. पण पत्रकार प्रबोधिनीला कधी त्या जागेची आठवण आलेली नाही.
अशाच संधीचा फायदा भुखंड माफिया घेत असतात. अशाच कोणी तरी एकाने एका धार्मिक व्यक्तीला हाताशी धरुन पत्रकार प्रबोधिनीच्या जागेवर झेंडा लावला आहे. सोबतच हळूहळू पत्राचे शेड टाकणे सुरू आहे. पत्रकार प्रबोधिनीच्या काही बापाची जागा नव्हती. ती जागा फुकटात मिळाली होती आणि मिळाली त्याच दरात गेली तर त्यांना दु:खही काही होणार नाही.
इतरांचे शोधून वर्तमान पत्रात लिहायचे आणि आपल्या पिट्टूंना विचारायचे बातमी वाचलीस काय? आणि हे सांगत असतांना आपल्या घाणेरड्या तोंडावर असलेल्या गालावर आलेल्या खळीतून छद्मी हसु असायचे. हे ठिक आहे इतरांचे उघड पाडायला मज्जा आली ना आता तुमचे कोणी तरी उघडे पाडत आहे. त्याला सुध्दा पाहा. नाही तर नंतर हा विषय धार्मिक होवून जाईल आणि मग तुम्हाला काही करता येणार नाही. तुम्हाला करता येत नसेल तर जे पत्रकार हे सर्व करू शकतात. त्यांच्या हातात हा सर्व कारभार द्या. तुमच्याकडचे पैसे त्यांना द्या आणि इतर महिन्याचा हिशोब त्यांना विचारा. पण यासाठी वृत्ती चांगली असावी लागते.
पत्रकार संघटनेच्या सिडकोमधील 10 हजार चौरस फुटाच्या भुखंडावर अतिक्रमण
