श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर

  • जिल्हाधिकारी राहुल कर्डिले निवडणूक निर्णय अधिकारी  

नांदेड,:- श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., बी-5, विष्णु कॉम्पलेक्स, हॉटेल ताज पाटील जवळ आय.टी.आय. नांदेडची निवडणूक जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत आज यासंदर्भातील माहिती जारी करण्यात आली.

ॲसीस्टंट रजिष्टार, को-ऑपरेशन, सी.ई.ए. (को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथोरेटी) 9 वा मजला, टावर-ई, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजी नगर, दिल्ली-110029 यांनी त्याचे पत्र दिनांक 17 जून 2025 नुसार सदर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणुक घेणेसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती केली आहे.

संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकूण 11 संचालक निवडून द्यावयाचे असून त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातुन आठ, अनुसूचीत जाती/जमाती मतदार संघातून एक आणि महिला राखीव मतदार संघातून दोन संचालकाची निवड करावयाची आहे.

सदर संस्थेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रमासह 27 ऑक्टोंबर 2025 रोजी संस्थेच्या पात्र मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. 29 ऑक्टोंबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे, प्राप्त झालेल्या आक्षेपाची छाननी 3 ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीत करण्यात येऊन 6 नोव्हेंबर 2025 रोजी संस्थेच्या सभासदांची अंतिम मतदार यादी दुपारी 3 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे.

7 ते 11 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सकाळी 11 ते दु. 3 यावेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. प्राप्त नामनिर्देशन पत्राची प्रसिध्दी 11 नोव्हेंबर 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. सदर प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर 2025 रोजी करुन वैध नामनिर्देशनपत्राची प्रसिध्दी 18 नोव्हेंबर 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. तसेच 25 नोव्हेंबर 2025 रोजी दु. 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र परत घेता येतील. त्यानंतर निवडुन द्यावयाच्या उमेदवारांची अंतिम यादी 25 नोव्हेंबर 2025 रोजी दु. 5 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 या कालावधीत मतदान घेण्यात येणार असुन मतमोजणी 1 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथॉरीटी नवी दिल्ली यांचेकडून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर 5 डिसेंबर 2025 रोजी संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल निवडणूक प्राधिकरणाचे पूर्व परवानगीनंतर घोषीत करण्यात येणार आहे.

श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. बी-5 विष्णु कॉम्पलेक्स हॉटेल ताज पाटील जवळ आय.टी.आय. नांदेडच्या सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., बी-5, विष्णु कॉम्पलेक्स हॉटेल ताजपाटील जवळ आय.टी.आय. नांदेड तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. अधिक माहिती संस्थेचे बी-5 विष्णु कॉम्पलेक्स हॉटेल ताज पाटील जवळ आयटीआय नांदेड येथील मुख्य कार्यालयात पहावयास मिळतील, असे प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!