पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी परमेश्र्वर चव्हाण यांची एक वर्षाची वेतनवाढ स्थगित केली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी मे-2025 मध्ये पाठविलेल्या कसुरी अहवालाची बारकाईनी तपासणी करून पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर चव्हाण यास संधी देवून अखेर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी कसुरी अहवालातील त्रुटींप्रमाणे सन 2021 ते 2024 असे चार वर्ष तोंडी आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेत काम करून अत्यंत चुकीचे काम करणाऱ्या आणि सध्या पोलीस ठाणे इतवारा येथे कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण यांना पुढील देय असलेली एक वार्षिक वेतनवाढ स्थगित करण्याची शिक्षा दिली आहे.
सन 2021 पुर्वीपासून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण यांना डॉक्टरची उपाधी देण्यात आली होती.त्यानंतर 2021 मध्ये त्यांना पोलीस उपनिरिक्षक ही पदोन्नती मिळाली. त्यानंतर सुध्दा ते तोंडी आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेतच कार्यरत राहिले. या संदर्भाची तक्रार आल्यानंतर पोलीस अधिक्षक नांदेड यांनी 12 मे 2025 रोजी या संदर्भाचा कसुरी अहवाल पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्याकडे पाठविला. या कसुरी अहवालानुसार त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. कारणे दाखवा नोटीसचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी शिक्षेचा आदेश पारीत केला आहे.
आपल्या आदेशात शहाजी उमाप यांनी असे लिहिले आहे की, 27 जुलै 2021 रोजी नियंत्रण कक्षाच्या डायरीमध्ये पोलीस अधिक्षक यांच्या तोंडी आदेशावरुन स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत असल्याचे लिहिले आहे. परंतू त्याबद्दलची लेखी स्वरुपाची माहिती पोलीस अधिक्षकांना कळवलेली नाही. स्थानिक गुन्हा शाखेत काम करत असले तरी तुमचे वेतन पत्र नियंत्रण कक्षातून दाखल होत होते. तसेच 1 ऑगस्ट 2023 रोजी शासकीय वाहनाने तीन पोलीस अंमलदार घेवून परभणी आणि त्याच दिवशी रात्री दोन पोलीस अंमलदार, एक होमगार्ड घेवून सोलापूर अशी रवानगी दाखवली. परंतू तेथे जावून काय काम करून आले. याबद्दलची माहिती लेखी स्वरुपात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षकांना दिली नाही. अशा अनेक रवानग्या आणि अर्धवट माहित्यांच्या नोंदी या आरोपात आहेत.
यासाठी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी कसुरी अहवालानुसार एक वर्षाची वेतनवाढ का स्थगित करण्यात येवू नये अशी कारणे दाखवा नोटीस परमेश्र्वर चव्हाण यांना दिली होती. त्याचा खुलासा दिल्यानंतर मला दिलेले स्पष्टीकरण आणि खुलाशावर समाधान नसल्याची नोंद करून पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण सध्या कार्यरत इतवारा पोलीस ठाणे यांना पुढील देय असलेली एक वर्षाची वेतनवाढ स्थगित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!