नांदेड(प्रतिनिधी)-90 दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र आणि पाल्यांच्या शैक्षणिक बोनाफाईड बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची 2 लाख 30 हजार 174 रुपयांची फसवणूक करणाऱ्या एक पुरूष आणि तिन महिन्यांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक कामगार आयुक्त यास्मीन अब्दुल गणी शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 जानेवारी 2024 ते आजपर्यंत प्रभु नारायण युरडवार रा.राठी मु.पिंपरण पो.कावलगाव ता.पुर्णा जि.परभणी, राधाबाई किशनराव घुसे रा.सिध्दनाथपुरी चौफाळा नांदेड, पुष्पा विजय झुंजारे रा.सिध्दार्थनगर बाळापूर ता.अर्धापूर जि.नांदेड, गंगाबाई दिगंबर कासरे रा.लोहा ता.हदगाव जि.नांदेड या चार जणांनी 90 दिवस काम केल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार केले आणि आपल्या पाल्यांचे शैक्षणिक बोनाफाईड सुध्दा बनावट दाखल केले आणि त्यांच्यासाठी असलेली 2 लाख 30 हजार 174 रुपयंाचा निधी उचलून शासनाची फसवणूक केली आहे.
शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 336(2), 336(3), 340(2) प्रमाणे तीन महिला आणि एका पुरूषाविरुध्द गुन्हा क्रमांक 336/2025 दाखल केला असून पोलीस निरिक्षक राजेश पुरी हे अधिक तपास करणार आहेत.
खोटे प्रमाणपत्र तयार करणाऱ्या तिन महिला आणि एका पुरूषाविरुध्द गुन्हा दाखल
