नांदेड(प्रतिनिधी)-मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे नुकसान झाले. शहर आणि ग्रामीण भागात लोकांच्या घराची पडझड झाली. अशा सर्व पिडीतांना योग्य मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टी शरद पवार गटाचे नांदेड शहर जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापुरकर यांनी पंतप्र्रधान, मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांनामार्फत निवेदन पाठविले आहे.
महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुर यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात आणि शहरी भागात पडलेल्या पावसामुळे नागरीकांच्या घरात पाणी शिरुन काही घरांची पडझड झाली आहे. काही घरांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व घटनांचे तात्काळ पंचनामे करून योग्य मदत नागरीकांना पुरवावी असा या निवेदनाचा आशय आहे. नाही तर पिडीत नागरीकांना सोबत घेवून राष्ट्रवादी कॉंगे्रस शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात लिहिले आहे. या निवेदनावर गणेश तादलापूरकर, प्रा.देविदास इंगळे, अंबादास भंडारे, निवृत्ती गायकवाड, गोविंद माऊलीकर, सुभाष सोमवारे, माधव चव्हाण यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.
अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांना मदत द्या-गणेश तादलापूरकर
