नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागात पोलीस अंमलदार या पदावर आपल्या जीवनाची सुरूवात केलेल्या पोलीसांसाठी चार वर्ष, पाच वर्ष आणि सहा वर्ष अशा वेगवेगळ्या निकषानुसार त्यांना पोलीस उपनिरिक्षक पदाची मर्यादीत विभागीय परिक्षा आता येता येईल आणि आपले पोलीस उपनिरिक्षक होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणता येईल असा शासन निर्णय राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव रविंद्र पाटील यांच्या डिजिटल स्वाक्षरीने गौरी पुजनाच्या दिवशी अर्थात 1 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित केला आहे.
राज्यात पोलीस अधिकारी भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीद्वारे 50 टक्के पद. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित मर्यादीत विभागीय स्पर्धा परिक्षा (LDCE) (पोलीस शिपाई, पोलीस नाईक आणि पोलीस हवालदार तसेच सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक यांच्यासाठी) महाराष्ट्र शासनाने पोलीस नाईक हे पद समाप्त केले आहे. तरी पण या शासन निर्णयामध्ये पोलीस नाईक हा शब्द वापरला आहे. यांच्यासाठी 25 टक्के आणि पदोन्नतीने सेवा ज्येष्ठता व गुणवत्ताच्या आधारावर 25 टक्के असे हे 100 टक्के पद भरतीचे स्वरुप आहे.
या परिक्षेसाठी पात्र असलेले पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे असतील. पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक हे ही मर्यादीत परिक्षा देवू शकतील. जे पोलीस शिपाई एसएससी मंडळाची परिक्षा किंवा समकक्ष परिक्षा उर्त्तीण झाले असतील ते या परिक्षेस पात्र ठरतील. ज्या वर्षी ही परिक्षा होणार आहे. त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी अशा पोलीस अंमलदारांची अखंडीत नियमित सेवा 6 वार्षांची पुर्ण झालेली असावी.
पोलीस दलात असलेला कर्मचारी एचएससी किंवा तत्सम समकक्ष परिक्षा उत्तीर्ण झालेला असेल आणि त्या पोलीस अंमलदारांना ज्या वर्षी ही परिक्षा द्यायची आहे. त्यावर्षी 1 एप्रिल रोजी त्यांची 5 वर्षाची किमान अखंडीत नियमित सेवा पुर्ण झालेली असावी.
पोलीस अंमलदार विद्याशाखेचा पदवीधर असेल किंवा महाराष्ट्र शासनाची समकक्ष परिक्षा उत्तीर्ण झालेला असेल, अशा परिस्थितीत त्याला विभागीय मर्यादीत परिक्षा द्यायची असेल त्यावर्षी 1 एप्रिल रोजी त्या पोलीस अंमलदाराची किमान चार वर्ष अखंडीत नियमित सेवा पुर्ण झालेली असावी.
ही परिक्षा देण्यासाठी पोलीस अंमलदाराचे वय 35 वर्ष पेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना या वयोमर्यादेत पाच वर्षाची सवलत आहे. ही परिक्षा देतांना या परिक्षा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कोणताही गुन्हा दाखल नसावा, त्याला शिक्षा झालेली नसावी. त्याविरुध्द चौकशी प्रलंबित नसावी. पोलीस उपनिरिक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या मर्यादीत विभागीय स्पर्धांमध्ये (2) लेखी परिक्षा आणि शारिरीक चाचणी यांचा अंतरभाव असेल. त्यासाठीचे गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केले जातील.
या परिक्षेची गुणवत्ता यादी लेखी परिक्षा, शारिरीक चाचणी परिक्षा यात मिळालेल्या गुणांची बेरीज करून तयार केली जाईल. खुल्या आणि राखीव प्रवर्गांसाठी विभागीय स्पर्धा परिक्षेची किमान अर्हता गुण(Cut Off Marks) महाराष्ट्र लोकसेवा आयोग निश्चित करेल. हा शासन निर्णय राज्य शासनाने संकेतांक 202509011806529429 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक होण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मर्यादीत विभागीय परिक्षा होणार
